Mahabhulekh Maha Bhumi Abhilekh 7/12 8अ मालमत्ता पत्रक क-प्रत ऑनलाईन बघणे

महाभुलेख महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख विभागाने बनविलेली एक वेबसाईट आहे. या वेबसाईटवर आपण सातबारा (7/12), 8 अ मालमत्ता पत्रक व जमीन मोजणीची नकाशा क-प्रत आपण येते माहितीस्तव पाहू शकतो. म्हणजेच bhulekh.mahabhumi.gov.in या वेबसाईटवर आपल्या जमिनीचा ऑनलाईन सातबारा बघणे. 

योजनेचे नाव:महा भूलेख महाभूमि, Mahabhumi abhilekh, Bhulekh Maharashtra
कोणा द्वारे सुरु झाली:जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख महाराष्ट्र शासन 
कोणासाठी:महाराष्ट्राचे नागरिक, भूधारक, जमिनीचे मालक व इतर 
योजनेचा उद्देश:भूमि अभिलेख Land ROR जमिनी संबंधित माहिती प्राप्त करणे 
अधिकृत वेबसाइट लिंक:bhulekh.mahabhumi.gov.in

Mahabhulekh Bhumi Abhilekh

Mahabhulekh (i.e. Maharashtra Bhumi Abhilekh Maha Abhilekh) महाराष्ट्र राज्यामध्ये चालणारी अशी वेबसाईट आहे ज्या वेबसाईटवर राज्यातील नागरिकांना अगदी सहजपणे 7/12 उतारा, 8A उतारा, मालमत्ता पत्रक property card आणि जमीन मोजणी नकाशाची क प्रत ऑनलाइन बघायला मिळू शकते. सातबारा उतारा व इतर दस्तावेज या वेबसाईटवर आपण फक्त माहितीस्तव बघू शकतो या दस्तऐवजांचा आपण कोणत्याही कायदेशीर बाबींसाठी वापर करू शकत नाही. सदरील दस्तावेज ऑनलाइन असल्यामुळे आपल्याला आपल्या जमिनी संबंधित कोणतीही माहिती पाहण्यासाठी वारंवार तलाठी कार्यालयावर अथवा तहसील कार्यालयामध्ये जाण्याची गरज नाही. 

पूर्वी असलेली महाभुलेख वेबसाईट वर फक्त सातबारा उतारा 8अ उतारा मालमत्ता पत्रक संबंधित माहिती होती. नवीन आलेल्या Mahabhulekh v2.0 वेबसाईटवर जमिनीची मोजणी झाल्यावर नकाशाची क-प्रत (K-Prat) सुद्धा आपण ऑनलाइन बघू शकतो. 

7/12 उतारा कसा बघावा?

गाव नमुना नंबर सातबारा(७/१२) बघण्यासाठी या वेबसाईटवर दोन पद्धती दिलेले आहेत.

  •  पहिल्या पद्धतीमध्ये जर का आपल्याला 11 अंकी प्रॉपर्टी यूआयडी क्रमांक माहीत असेल तर Property UID Number येथे टाईप करा. 
  • मोबाईल नंबर टाईप करा.
  •  सांकेतिक क्रमांक म्हणजे कॅपच्या टाईप करा.
  •  युआयडी नंबर माहित असेल तर आपण सातबारा अगदी सोप्या पद्धतीने बघू शकतो.

दुसऱ्या पद्धतीमध्ये खालील प्रमाणे चरणाचा वापर करून आपण ७/१२ उतारा 8अ होऊ शकतो. 

  • ऑनलाइन सातबारा उतारा बघण्यासाठी सर्वप्रथम भूमी अभिलेख महाभुमी महाभुलेख वेबसाईट bhulekh.mahabhumi.gov.in ओपन करा.
  • रेडिओ बटन द्वारे आपला जिल्हा निवडा .(जसे- पुणे, जळगाव, नाशिक,छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), नागपूर,हिंगोली, जालना, कोल्हापूर, सातारा) 
  • वरील पद्धतीने जिल्हा निवडल्यानंतर तालुका व गाव निवडा.
  • सातबारा उतारा शोधण्यासाठी या वेबसाईट वर आपल्याला सर्वे नंबर/ गट नंबर (Survey/Gat Number) व नाव(Name) असे पर्याय दिसतात. 
  • जर का आपल्याला जमिनीचा सर्वे नंबर/गट नंबर माहित नसेल तर नाव(Name) हे रेडिओ बटन सिलेक्ट करा. 
  • नाव(Name) या रेडिओ बटनचा वापर करून आपले नाव टाईप करा व आपले नाव शोधा. 
  • सर्वे नंबर गट नंबर माहित असेल तर सोपा पर्याय सर्वे नंबर/गट नंबर निवडा. 
  • गट नंबर सर्वे नंबर टाईप करून झाल्यावर शोधा या बटणावर क्लिक करा. 
  • गट नंबर सर्वे नंबर बरोबर योग्य निवडा कारण काही गटांमध्ये अ, ब, क किंवा एक, दोन, तीन असे पर्याय असतात.
  • सातबारा उतारा ऑनलाइन बघण्यासाठी आपला दहा अंकी मोबाईल नंबर योग्य पद्धतीने टाईप करा.
  • आपल्याला ज्या कोणत्या भाषेमध्ये सातबारा उतारा हवा असेल ती भाषा निवडा या ठिकाणी आपल्याला 23 ते 24 भाषा दिलेल्या आहेत. 
  • Captcha सांकेतिक क्रमांक  योग्य पद्धतीने बरोबर टाईप करा व Submit टॅब वर क्लिक करा.
  • येथे गाव नमुना सात (अधिकार अभिलेख पत्रक) व गाव नमुना 12 (पिकांची नोंदवही) म्हणजेच सातबारा(7/12) आपल्यासमोर प्रदर्शित आहे.
  • Ror महाभुलेख महाभुमी वेबसाईटवर दर्शविलेली ऑनलाइन माहिती ही आपण कोणत्याही शासकीय अथवा कायदेशीर बाबींसाठी वापरू शकत नाही.
  • कायदेशीर व शासकीय बाबींसाठी वापरासाठी सातबारा उतारा महाभुमी वेबसाईट digitalsatbara.mahabhumi.gov.in वर मिळेल. 

जमाबंदी पत्रक 8अ उतारा Online बघा

  • ऑनलाइन 8अ उतारा बघण्यासाठी सर्वप्रथम भूमी अभिलेख महाभुमी महाभुलेख वेबसाईट bhulekh.mahabhumi.gov.in ओपन करा.
  • रेडिओ बटन माध्यमाने आपला जिल्हा निवडा .(जसे- पुणे, जळगाव, नाशिक,छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), नागपूर,हिंगोली, जालना, कोल्हापूर, सातारा) 
  • जिल्हा निवडल्यानंतर वरील प्रमाणेच तालुका व गाव सुद्धा निवडा.
  • खाते क्रमांक किंवा नाव यापैकी जे योग्य वाटेल त्याची निवड करा .
  • मोबाईल क्रमांक नोंदवा .
  • भाषा निवडा सांकेतिक क्रमांक लिहा व सबमिट करा. 
  • गाव नमुना आठ-अ धारण जमिनींची नोंदवही (कृषिक) आसामीवार–खतावणी जमाबंदी पत्रक आपल्यासमोर दिसत आहे. 
  • भुलेख महाभुमी अभिलेख वेबसाईटवर दाखविलेली माहिती ही कोणत्याही शासकीय अथवा कायदेशीर बाबींसाठी वापरता येणार नाही.
  • कायदेशीर अथवा शासकीय बाबींसाठी  8 अ उतारा महाभुमी वेबसाईट digitalsatbara.mahabhumi.gov.in मिळेल.
Scroll to Top