Aaple Abhilekh जुना ७/१२, जुने फेरफार व नोंदवही, जुने प्रॉपर्टी कार्ड

जर का तुम्हाला कुठल्याही कारणास्तव जमिनीची जुनी कागदपत्रे हवी असतील तर तुम्ही ती आता ऑनलाइन काढू शकता. हे लेख वाचल्यानंतर तुम्हाला काही मिनिटातच महाराष्ट्रातील जमिनीची जुनी कागदपत्रे काढता येईल. या शिवाय चालू वर्षातील विना स्वाक्षरीतील ७/१२, ८अ, मालमत्ता पत्रक बघण्यासाठी Bhumi Abhilekh पोर्टल ला भेट द्या.

चालू वर्षातील विना स्वाक्षरीतील ७/१२, ८अ
आणि मालमत्ता पत्रक
DigitalSatbara – (डिजिटल स्वाक्षरीतील ७/१२,
८अ, फेरफार, मालमत्ता पत्रक)
आपली चावडी – (फेरफार स्थिती, नोटीस, मोजणी)महाभूनकाशा – (जमिनीचा नकाशा)
विषयजमिनीची जुनी कागदपत्रे
पोर्टलआपले अभिलेख (Aaple Abhilekh)
अधिकृत
लिंक
aapleabhilekh.mahabhumi.gov.in/erecords

जुना ७/१२, जुने फेरफार व नोंदवही, जुने प्रॉपर्टी कार्ड

Go to Aaple Abhilekh Portal >

Page > aapleabhilekh.mahabhumi.gov.in

जुने ७/१२ आणि इतर जुनी कागदपत्रे काढण्यासाठी Aaple abhilekh हे पोर्टल तुम्हाला वापरायचे आहे. या पोर्टल वर तुम्हाला सर्व प्रकारची जमिनीची जुनी कागदपत्रे मिळतात.

जर का तुम्ही हे पोर्टल पहिल्यांदा वापरत असाल तर Registration करून घ्या किंवा तुम्ही अगोदरच रजिस्टर असाल तर Login करून घ्या. रेजिस्ट्रेशन साठी तुम्हाला केवळ तुमची Personal Information, Addres आणि Login Information भरावी लागेल. रेजिस्ट्रेशन झाल्यावर तुमची Login Information वापरून या पोर्टल वर लॉगिन करा.

Mahabhulekh Aaple Abhilekh land record search

आता Basic Search मध्ये तुम्हाला जमिनीच्या ठिकाणाचा पत्ता निवडायचा आहे तो तुम्ही सूची मधून निवडा आणि त्यानंतर तुम्हाला जो जुना दस्तावेज (Old Land Record) हवा आहे तो निवडा आणि Search बटनावर क्लिक करा.

Search Result Old Land Record

Search Result मध्ये तुम्हाला Survey Number नुसार एक सूची दिसेल त्या मधून तुमचा दस्तावेज ओळखा आणि Add to Cart या बटनावर क्लिक करा.शेवटी Cart मध्ये जाऊन ती फाईल Download करा. आता तुम्ही ती फाईल ओपन करून पाहू शकता किंवा प्रिंट करू शकता.

Download Old Land Record

सूचना (Notice) –

  • जुनी कागदपत्रे (Old Land Record) फक्त काही निवडक शहरांसाठीच उपलब्ध करण्यात आली आहे.
  • जर का तुमचे शहर किंवा जुनी दस्तावेज या पोर्टल वर उपलब्ध नसेल तर तुम्ही ती तुमचा भूमि अभिलेख विभागात जाऊन अर्ज देऊन ती काढू शकता.

Leave a Comment